देशातील 901 पोलिस कर्मचार्यांना सेवापदके प्रदान
माझी बातमी | MB NEWS
माझी बातमी....हे एक आपल्या हक्काचं व विविध वैशिष्ट्यपूर्ण विषयांना वाहिलेले डिजीटल पत्रकारीतेचे व्यासपीठ आहे.वैविध्यपूर्ण माहिती,विशेष वृत्तीचा,विविध क्षेत्रातील वार्तांकन आजच्या बदलत्या डिजीटल युगाप्रमाणे online साधनाद्वारे देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाचकांचा विश्वास व बातमी,माहिती,विषय निकोप, दर्जेदार व सामाजिक भान या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.आपली साथ,सहकार्य व प्रोत्साहन निश्चितच आमच्या पाठिशी राहिल ही अपेक्षा आहे.आपले मार्गदर्शन, सुचना,प्रतिसाद व प्रतिक्रीयांचे स्वाग
बुधवार, २५ जानेवारी, २०२३
MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्यांना राष्ट्रपती पोलिस पदक
MB NEWS: या आठवड्यात पाऊस? मरावाडा, विदर्भात पावसाची शक्यता; वरिष्ठ हवामानतज्ज्ञांचे ट्वीट
या आठवड्यात पाऊस? मरावाडा, विदर्भात पावसाची शक्यता; वरिष्ठ हवामानतज्ज्ञांचे ट्वीट
--------
मुंबई : सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपाचा परिणाम म्हणून किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, डहाणू येथे मात्र शुक्रवार आणि शनिवार पुन्हा एकदा वाऱ्यांचा प्रभाव जाणवला. कमाल तापमानात घट झाली. एका मागून एक दोन पश्चिमी प्रकोप पुढील आठवड्यात सक्रिय होणार असून याचा परिणाम म्हणून २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरिष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.२० ते २६ जानेवारी आणि त्यानंतर २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावाखाली भारताचा उत्तर भाग आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथे या कालावधीत पाऊस पडू शकतो. पश्चिमी प्रकोप स्थितीमुळे चक्रीय वात स्थितीची शक्यता असून ही प्रणाली पूर्वेकडे सरकेल. या प्रवासात या प्रणालीला अरबी समुद्रातून आर्द्रतेचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे २३ ते २७ जानेवारीदरम्यान पाऊस किंवा बर्फवृष्टीची शक्यता संभवते. २४ ते २६ जानेवारीदरम्यान याचा प्रभाव सर्वाधिक असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. यानंतर ही प्रणाली पूर्वेकडे सरकल्यावर राज्यात तिचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे. यामुळे थोडे ढगाळ वातावरणही निर्माण होऊ शकते.गारा पडण्याची शक्यता२६ जानेवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या परिणामांचा प्रभावही लक्षात येईल. बर्फवृष्टी तीव्र झाल्यास राज्यात जानेवारीचे शेवटचे दोन ते तीन दिवस थंडीची तीव्रता वाढू शकते, असाही अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार येथे गाराही पडू शकतात. मात्र याचा नेमका अंदाज २३ जानेवारीला रात्री पश्चिमी प्रकोप अधिक सक्रिय झाल्यानंतर उमटणाऱ्या पडसादानंतरच येऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार मात्र राज्यात २५ जानेवारीपर्यंत राज्यात कोरडे वातावरण असेल.
मंगळवार, २४ जानेवारी, २०२३
आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२३
आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२३
मेष
मेष : हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर ऊर्जा खर्च करा. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य
वृषभ
वृषभ : व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल.
मिथुन
मिथुन : पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. दूर अंतरावर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील.
कर्क
कर्क : आध्यात्मिक गुरू, वडीलधार्यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्हाला जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आज ती इच्छा पूर्ण होईल.
सिंह
सिंह : थोडा आराम, विश्रांती मिळेल. काळजी घेणारा मित्र भेटेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत वचन देऊ नका.
कन्या : जे लोक दूध व्यवसायात आहेत अशांना आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. गरज भासलीच तर मित्र नक्की मदतीला धावून येतील.
तुळ : तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. इतरांवर खर्च करणे टाळा.
वृश्चिक : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आज सर्वचजण तुमच्याशी मैत्रीचा प्रयत्न करतील आणि तुम्हीही हे बंधन आनंदाने स्वीकाराल.
धनु : तुमचे धैर्य पाहून तुम्हाला प्रेम मिळेल. अपेक्षित असलेली कौतुकाची थाप आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल.
मकर : दिवस रोमँटिक असण्याचे संकेत आहेत. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बराच काळ वाट पाहात असलेली कीर्ती, मान्यता मिळेल.
कुंभ : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. कामकाजाच्या ठिकाणी होणार्या विविध बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.
मीन : कामातील चुका मान्य करणे फायद्याचे ठरेल. स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असल्यास माफी मागा.
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२
majhibatmi.com चे NEWS BULLETIN
majhibatmi.com चे NEWS BULLETIN
www.majhibatmi.com |
------------------------------------------------------
● बातमी वाचण्यासाठी व पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा.👇👇👇👇👇👇
🌑 जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड
🌑 विक्रम गोखले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
🌑२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध
🌑राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
🌑बुद्धिबळ स्पर्धेत परळीच्या विद्यार्थीनीची विभाग स्तरावर निवड
🌑 अभिनेता प्रशांत दामलेना मानाचा पुरस्कार
🌑● *पहा- खास बातचीत: सांगा मराठवाड्याने हे कुठवर सोसायचं? | मराठवाडा जनता परिषदेची नेमकी भूमिका.*
🌑 मराठवाडा स्वतंत्र राज्य विषयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे संतापल्या.
🌑 परळी तालुक्यात घडवले जातायत पोलीस व सैन्यात जाण्यासाठी उमेदवार
🌑 विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहताना पंकजा मुंडे भावूक
🌑 मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांच्याशी महत्त्वपूर्ण बातचीत
🌑 महिला कपडे न घालताही सुंदर दिसतात: रामदेवबाबा यांच्या विधानावर वादंग
MB NEWS-परळीत 2 डिसेंबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
परळीत 2 डिसेंबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
परळी. येत्या 2 डिसेंबर रोजी परळीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आदि क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तसेच काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संयोजक विकास वाघमारे यांनी केले आहे.
परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक, दिग्दर्शक, नाटककार रानबा गायकवाड हे या शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये कार्यकर्ता कसा असावा? कार्यकर्ता बनण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे? कार्यकर्त्यांना भाषणाची कला अवगत असावी. भाषण कसे करायचे? लोकांवर आपला प्रभाव कसा पाडायचा? विविध कार्यालयातील कामे कशी करायची. लोकांचे प्रश्न सोडत असताना ते कसे सोडवायचे. याबरोबरच विविध क्षेत्राशी निगडित माहिती या शिबिरामध्ये दिली जाणार आहे. शिबिरासाठी प्रवेश नोंदणी अगोदर करणे गरजेचे आहे.
या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्ते, तरुणांनी संयोजक विकास वाघमारे तसेच विद्याधर सिरसाट यांच्याशी 90 28 348 358 तसेच 7721963532 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
MB NEWS-लक्ष्मीबाई देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
लक्ष्मीबाई देशमुख राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.२६) करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थिंनींनी बुध्दीबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर यश संपादन केल्याबद्दल अरशिया कच्ची, मुस्कान शेख, प्रणिता देवधरे यांचा सत्कार तसेच प्रशिक्षक श्री.तपके यांचा करण्यात आला. मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारताचे संविधान जगात एकमेव आहे की, ज्या संविधानाची सुरुवात आम्ही लोक व शेवट जनतेलाच समर्पित करण्यात आले असल्याने प्रतिपादन केले. प्राचार्य मुंडे व विद्यार्थिनींनी यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केला. प्रास्ताविक प्रा.प्रविण फुटके, सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. राजर्षी कल्याणकर, आभार प्रा.डॉ. रंजना शहाणे यांनी मानले तर कार्यक्रमास प्रा.डॉ.प्रविण दिग्रसकर, प्रा.राठोड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात २६/११ च्या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
MB NEWS-कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल गौरी नागराळेचा सत्कार
कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल गौरी नागराळेचा सत्कार
परळी (प्रतिनीधी)
परळी येथील रहिवासी कु.गौरी दिगांबर नागराळे या विद्यार्थीनीने शालेय कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल युवानेते महेश उर्फ मुन्ना बागवाले मित्रपरिवाराने गौरव केला.
नुकत्याच पार पडलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत बीड जिल्हातून 45 किलो वजनी गटामध्ये कु गौरी दिगंबर नागराळे हीने प्रथम क्रमांक मिळविला.तीचा युवानेते महेश उर्फ मुन्ना बागवाले यांच्या वतिने संपर्क कार्यालयात शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.कुस्ती स्पर्धेत परळीतील शालेय विद्यार्थीनीने जिल्हास्तरावर यश संपादन करणे ही गौरवाची बाब असल्याचे यावेळी मुन्ना बागवाले यांनी सांगितले.यावेळी मुन्ना बागवाले मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२
MB NEWS-देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट - संचिता टाक
संचिता संदिप टाक हिची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड
देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट - संचिता टाक
परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.26 - परळी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शहरातील संचिता टाक ही विजयी झालेली आहे.ती फाउंडेशन स्कूलची विद्यार्थिनी आहे.या विजयाने तिची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली असून याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.पोद्दार लर्न स्कुल येथे शुक्रवारी आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 11 तालुक्यातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये 5 स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.यामध्ये संचिता संदीपराव टाक या विद्यार्थिनींचा सहभाग आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला,फाऊंडेशन स्कुल चे प्राचार्य दत्ता नरहारे सर,गजानन नागझरे सर,क्रीडा शिक्षक ओम मेनकुदळे,बुद्धिबळाचे प्रशिक्षक तपके,वर्गशिक्षक राहुल गुट्टे यांनी अभिनंदन केले आहे.
विश्वनाथ आनंद माझे आदर्श आहेत, भावाकडून बुद्धिबळ शिकले.शाळेतील शिक्षकांनी खेळासाठी प्रोत्साहन दिले म्हणूनच हे यश भेटले आहे.कुटूंबातील सदस्यांचे खेळासाठी पाठबळ असल्याचे संचिता ने सांगितले.पुढे देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ती म्हणाली यासाठी परिश्रम घेत असल्याचे तिने सांगितले.वडील संदीप टाक व संपूर्ण परिवाराने तिच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
MB NEWS-वंचित बहुजन युवा आघाडी परळीच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - गफार खान, प्रेम जगतकर
वंचित बहुजन युवा आघाडी परळीच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - गफार खान, प्रेम जगतकर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार खान व युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून व बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन व वाटप करणे तसेच संविधानामुळे भारतीय महिलांचा झालेला विकास व धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास संविधानावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य कमलाकर कांबळे ज्येष्ठ विचारवंत तथा बहुत अध्यक्ष बौद्ध साहित्य परिषद माननीय सौ सीताताई बनसोड नगराध्यक्ष केज शहर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट अनंतराव जगतकर हे राहणार असून कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर आंबेडकरी विचारवंत माननीय जेके कांबळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माननीय रानबा गायकवाड लेखक साहित्यिक संपादक पत्रकार प्राध्यापक विलास रोडे, एजाज भाई माननीय एडवोकेट राजू वकील व प्राध्यापक डॉक्टर यशश्री बालासाहेब जगतकर श्री भद्रे एच.टी. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2, माननीय हनुमंत वाघमारे भारतीय बौद्ध महासभा परळी तालुका सचिव परळी तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे आधी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारखान व वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.
majhibatmi.com चे NEWS BULLETIN
majhibatmi.com चे NEWS BULLETIN
www.majhibatmi.com |
------------------------------------------------------
● बातमी वाचण्यासाठी व पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा.👇👇👇👇👇👇
● *एक कोटी रूपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_182.html
● *सोयाबीन-कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्यासाठी केंद्राशी चर्चा करणार*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_439.html
● *कृषी कर्जाला सिबिलची अट लावल्यास कारवाई करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_380.html
● *अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_224.html
● *कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_288.html
■ *जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत महिला महाविद्यालयाचे घवघवीत यश, महाविद्यालयाचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_747.html
■ *शेतकरी व कामगारांचे प्रश्न : अ.भा.किसान सभेने केलं परळीत धरणे आंदोलन.*
#mbnews #subscribe #like #share #comments
■ *२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी परळीत रक्तदान शिबिर*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_140.html
*यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का?*
https://majhibatmi.blogspot.com/2022/11/mb-news_146.html
*■ महिला कपडे न घालताही सुंदर दिसतात | योगगुरु रामदेवबाबांचे विवादास्पद वक्तव्य.*
#mbnews #subscribe #like #share #comments
MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्यांना राष्ट्रपती पोलिस पदक
देशातील 901 पोलिस कर्मचार्यांना सेवापदके प्रदान महाराष्ट्रातील चार अधिकार्यांना राष्ट्रपती पोलिस पदक नवी दिल्ली, Repub...
-
आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२३ मेष मेष : हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर ऊर्जा खर्च करा. पालकांच्य...
-
या आठवड्यात पाऊस? मरावाडा, विदर्भात पावसाची शक्यता; वरिष्ठ हवामानतज्ज्ञांचे ट्वीट -------- मुंबई : सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपाचा...
-
देशातील 901 पोलिस कर्मचार्यांना सेवापदके प्रदान महाराष्ट्रातील चार अधिकार्यांना राष्ट्रपती पोलिस पदक नवी दिल्ली, Repub...