शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना सरसावली

 शेतकऱ्यांचे नुकसान: मदतीसाठी बाळासाहेबांची शिवसेना  सरसावली


परळी वैजनाथ:-

                         मागील काही वर्षांत राज्यावर अनेक संकट ओढवली होती,पण यावर्षी सर्व संकट दूर झाली, आणि पर्जन्यकाल देखील मुबलक झाल्याने,सर्वच पीक उतरा योग्य आला होता,त्यातच परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, तरीही काही पीक अतिशय उत्तम आलं होतं,यामध्ये परळी शिवारातील चंद्रकांत देशमुख, व गोविंद चंद्रकांत देशमुख यांचे तीन एककर दहा गुंठ्या मधील,सोयाबीन काढून, खळ्यासाठी रचून ठेवले अस्तनांना, रात्रीतून काही समाजघातक प्रवृत्तीनी रात्रीतून सोयाबीन ढिगाऱ्यास आग लावून दिली,व बघता बघता संपूर्ण सोयाबीनची अक्षरशः राख झाली,ऐन दिवाळीत बळीराजा पूजन अस्तनांना, आपल्या भागातील बळीराजा वर काळी दिवाळी काळी करायची पाळी आली

Video News पहाण्यासाठी क्लिक करा:https://youtu.be/WmYIPM0LguY

 बाळासाहेबांची शिवसेनेचे, उपजिल्हाप्रमुख अँड रामराव माने,सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख, संजय गावडे कदम,दीपक जोशी,नवनाथ सरवदे,नारायण फड यांच्या सह ईतर बाळासाहेबांचे शिवसैनिकांनी,  शेतकरी चंद्रकांत देशमुख, गोविंद देशमुख यांनी थेट शेतात जाऊन पहाणी केली.  तहसीलदार, तलाठी यांनी याविषयी त्वरित मदत दयावी,अन्यथा, राज्यातील कृषी मंत्री,मुख्यमंत्री यांच्या कडे संबंधित अधिकारी वर्गाची तक्रार करणार असल्याचे सांगितले.

■ हे देखील वाचा:

https://majhibatmi.blogspot.com/2022/10/mb-news_263.html

क्लिक करा:*अल्पवयीन दोन मुलांचे अपहरण*

क्लिक करा:*सिव्हिल इंजिनिअर शुभम नितीन शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाला स्नेहीजनांची मोठी उपस्थिती*

 अंत्यसंस्कार करायला घेऊन जाताना... तिरडीवर बसला तो उठून

     भर दिवाळीत  अकोल्यातल्या  एका घरावर संकट कोसळलं. घरातल्या तरण्या ताठ्या मुलाचा मृत्यू झाला.

काळजावर दगड ठेवून नातेवाईकांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. जाणकार मंडळींनी तिरडी बांधली. त्याचा देह तिरडीवर चढवला. आता उचलून स्मशानात  नेत होते, तोच जे घडलं, त्यानंतर गावातले लोक चळाचळा कापायला लागले.

मृत झालेल्या या तरुणाचे अचानक हात-पाय हालू लागले. खांद्यावर असलेली तिरडी हलू लागल्याने नातेवाईक घाबरले. त्यांनी एका मंदिरात तिरडी उतरवायचं ठरवलं… थोडी हालचाल करून तो तरुण थेट तिरडीवरून उठूनच बसला. मृत तरुण असा एकाएकी उठून बसल्यानंतर अनेकांना धक्का बसला.


हा प्रकार घडला बुधवारी. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात. तरुणाचं नाव आहे प्रशांत मेशरे.

प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. 25 वर्षांच्या प्रशांतच्या मृत्यूचा धक्का पचवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती.

क्लिक करा:*सिव्हिल इंजिनिअर शुभम नितीन शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाला स्नेहीजनांची मोठी उपस्थिती*

मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तिरडी अचानक हलू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी मंदिरात मृतदेह आणला. तेवढ्यात प्रशांत उठूनच बसला.

अचानक तो तिरडीवरून उठून बसल्याने अख्खा गाव हे पाहण्यासाठी आलं. मंदिर परिसरात एवढी गर्दी झाली की जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही बोलवावं लागलं.

अल्पवयीन दोन मुलांचे अपहरण

 अल्पवयीन दोन मुलांचे अपहरण

केज:- केज तालुक्यातील मस्साजोग येथून दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.

● हे देखील वाचा:अंत्यसंस्काराला नेतानाच तिरडीवर तो बसला उठून


या बाबतची माहीती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथून दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या दरम्यान सुमीत विकास रोडे रा. मस्साजोग आणि त्याचा मित्र गोवींद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा या दोघांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी अपहृत मुलाचे वडील विकास लिंबाजी रोडे यांच्या तक्रारी वरून दि. २७ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. न. ४९२/२०२२ भा. दं. वि. ३६३ नुसार अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.

MB NEWS-गाढे पिंपळगावच्या पुरात वाहून गेलेल्या आकाश आरगडेच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन

 गाढे पिंपळगावच्या पुरात वाहून गेलेल्या आकाश आरगडेच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन




नाथ प्रतिष्ठाण कडून 50 हजारांची मदत; आरगडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू - धनंजय मुंडे

परळी (दि. 27) - परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील 25 वर्षीय तरुण आकाश विक्रम आरगडे हा दि. 21 रोजी अतिवृष्टी मुळे गावकुसाच्या नदीला आलेल्या पुरात वाहून जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी गाढे पिंपळगाव येथे जाऊन आरगडे कुटुंबियांचे सांत्वन केले. 

आरगडे कुटुंबियांना धीर देताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या वतीने आकाश च्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना निराधार योजनेतून अर्थसहाय्य सुरू करणे व अन्य बाबींसाठीही संबंधित अधिकाऱ्यांना श्री मुंडे यांनी सूचना दिल्या. यावेळी आरगडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाजार समितीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, शरद पाटील राडकर, प्रशांत आप्पा थोंटे, पांडुरंग गंगणे, ॲड. श्रीकांत कराड, लक्ष्मण राडकर, विकास सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, भगवान राडकर  यांसह आदी उपस्थित होते.
-------------------------


MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक

  देशातील 901 पोलिस कर्मचार्‍यांना सेवापदके प्रदान महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक                   नवी दिल्ली, Repub...