अल्पवयीन दोन मुलांचे अपहरण
केज:- केज तालुक्यातील मस्साजोग येथून दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे.
● हे देखील वाचा:अंत्यसंस्काराला नेतानाच तिरडीवर तो बसला उठून
या बाबतची माहीती अशी की, केज तालुक्यातील मस्साजोग येथून दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या दरम्यान सुमीत विकास रोडे रा. मस्साजोग आणि त्याचा मित्र गोवींद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा या दोघांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी अपहृत मुलाचे वडील विकास लिंबाजी रोडे यांच्या तक्रारी वरून दि. २७ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. न. ४९२/२०२२ भा. दं. वि. ३६३ नुसार अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा