गाढे पिंपळगावच्या पुरात वाहून गेलेल्या आकाश आरगडेच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंकडून सांत्वन
नाथ प्रतिष्ठाण कडून 50 हजारांची मदत; आरगडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू - धनंजय मुंडे
परळी (दि. 27) - परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील 25 वर्षीय तरुण आकाश विक्रम आरगडे हा दि. 21 रोजी अतिवृष्टी मुळे गावकुसाच्या नदीला आलेल्या पुरात वाहून जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी गाढे पिंपळगाव येथे जाऊन आरगडे कुटुंबियांचे सांत्वन केले.
आरगडे कुटुंबियांना धीर देताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या वतीने आकाश च्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना निराधार योजनेतून अर्थसहाय्य सुरू करणे व अन्य बाबींसाठीही संबंधित अधिकाऱ्यांना श्री मुंडे यांनी सूचना दिल्या. यावेळी आरगडे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाजार समितीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, शरद पाटील राडकर, प्रशांत आप्पा थोंटे, पांडुरंग गंगणे, ॲड. श्रीकांत कराड, लक्ष्मण राडकर, विकास सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, भगवान राडकर यांसह आदी उपस्थित होते.
-------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा