अंधेरीत पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी भगवा फडकवला
परळी शिवसेनेच्या वतीने अंधेरी पोटनिवडणूक विजयाचा फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव
मशाल पेटली; अंधेरी जिंकली - अभयकुमार ठक्कर
------------------------------
Video News पहाण्यासाठी 👇👇 खालील ओळींवर क्लिक करा....
------------------------------
परळी वैजनाथ प्रतिनिधी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळविला आहे. ऋतुजा लटके या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत. याबद्दल परळी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
वाचा: ● *अंधेरी पूर्व पोटनिवडणुक : ऋतुजा लटके विजयी दोन नंबरची मते नोटाला*
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आज रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली व युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक अतुल दुबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या प्रचंड मतांनी विजयी झाल्याचे समजतात शिवसैनिक एकत्र आले.
Click-● राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी दरम्यान होणार
यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला असून मशाल पेटली; अंधेरी जिंकली असे सांगून यापुढे महाराष्ट्रात सर्वत्र मशाल पेटवून आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले.
Click-■ *खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यामुळे टॉवर चौक परिसर दणाणून गेला होता.
Click-● *दुर्दम्य आत्मविश्वास : ८० वर्षाचा 'चिरतरुण'....!* _#mbnews # subscribe #like #share #comments_
यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक अतुल दुबे, माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके,माजी शहरप्रमुख नागनाथ पवार, शिवसेना जेष्ठ नेते सतीश जगताप, शिवसेना माजी परळी शहर संघटक संजय कुकडे, युवा सेनेचे विधानसभा प्रमुख मोहन परदेशी शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदेले, मोहन राजमाने, विद्यार्थी सेना माजी तालुका समन्वयक अमित कचरे, शिवाजी नगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाने, तळ प्रमुख श्रीनिवास सावजी, योगेश घेवारे, बबन ढेंबरे,मनीष जोशी, प्रकाश देवकर, नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड, बजरंग औटी,यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________
हे देखील वाचा\पहा......
Click-■ *कलावंतांसाठी महत्वपूर्ण: राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबर पर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन*
Click-■ *आरोग्य विभाग:अर्ज मागवले,मुलाखती झाल्या, नियुक्तीपत्र दिले, काही जण रुजुही झाले अन् भरती प्रक्रियेला स्थगिती
□ *पहा: चोरट्यांनी फोडले घर अन् पळविला ११लाखांचा ऐवज. | परळी पोलीसांना चोरट्यांचे आव्हान.* #mbnews # subscribe #like #share #comments