ॲड. विष्णुपंत सोळंके यांच्या हस्ते बीड चौफेर दीपावली विशेषांकाचे प्रकाशन
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री विष्णुपंत सोळंके यांच्या हस्ते बीड चौफेर या वृत्तपत्राच्या दीपावली विशेषांक 2022 चे प्रकाशन आज शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
येथील आदर्श मल्टीस्टेट येथे आज शनिवारी ॲड.विष्णुपंत सोळंके यांच्या हस्ते बीड चौफेर या वृत्तपत्राच्या दीपावली विशेषांकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संपादक बालाजी ढगे यांच्या हस्ते ॲड श्री विष्णुपंत सोळंके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हे देखील वाचा:● *आपल्यावर जो भुंकतो त्याचे असे हाल करतो असे म्हणत कुत्र्याला बंदुकीच्या गोळ्या घालून मारले ठार*
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन सोळंके सरपंच नागापूर, ॲड. रणजीत सोळंके, ॲड. अमोल सोळंके, बीड चौफेरचे संपादक बालाजी ढगे, कार्यकारी संपादक शेख मुकरम, परळी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गिते, शिवलिंग आप्पा मरळे, व्यवस्थापक आदर्श पतसंस्था व मल्टीस्टेट, सत्यजित सोळंके एमडी शेतकरी जिनिंग परळी वैजनाथ, बळीराम वाघमारे , बालासाहेब सोळंके, शंकर सोळंके ,नागनाथ सोळंके ,शिवाजी सोळंके ,सुंदर सोळंके ,बालासाहेब शिंदे, सुरज शिंदे ,सोमेश्वर गाढवे ,सुनील बोबडे, सोमेश्वर मोरे ,अंगद सरवदे ,मोहन गुंडाळे, प्रवीण सोळंके यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार महादेव गीते यांचा सत्कार
परळी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष महादेव गीते यांना नुकताच सावित्री ज्योती राज्यस्तरी समता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा आज शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ॲड विष्णुपंत सोळंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड विष्णुपंत सोळंके व उपस्थित सर्व मान्यवरांनी पत्रकार महादेव गीते यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा