वंचित बहुजन युवा आघाडी परळीच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - गफार खान, प्रेम जगतकर
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार खान व युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिली आहे. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून व बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडी परळी शहराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन व वाटप करणे तसेच संविधानामुळे भारतीय महिलांचा झालेला विकास व धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास संविधानावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य कमलाकर कांबळे ज्येष्ठ विचारवंत तथा बहुत अध्यक्ष बौद्ध साहित्य परिषद माननीय सौ सीताताई बनसोड नगराध्यक्ष केज शहर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट अनंतराव जगतकर हे राहणार असून कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर आंबेडकरी विचारवंत माननीय जेके कांबळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माननीय रानबा गायकवाड लेखक साहित्यिक संपादक पत्रकार प्राध्यापक विलास रोडे, एजाज भाई माननीय एडवोकेट राजू वकील व प्राध्यापक डॉक्टर यशश्री बालासाहेब जगतकर श्री भद्रे एच.टी. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2, माननीय हनुमंत वाघमारे भारतीय बौद्ध महासभा परळी तालुका सचिव परळी तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे आधी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफारखान व वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा