कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल गौरी नागराळेचा सत्कार
परळी (प्रतिनीधी)
परळी येथील रहिवासी कु.गौरी दिगांबर नागराळे या विद्यार्थीनीने शालेय कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल युवानेते महेश उर्फ मुन्ना बागवाले मित्रपरिवाराने गौरव केला.
नुकत्याच पार पडलेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत बीड जिल्हातून 45 किलो वजनी गटामध्ये कु गौरी दिगंबर नागराळे हीने प्रथम क्रमांक मिळविला.तीचा युवानेते महेश उर्फ मुन्ना बागवाले यांच्या वतिने संपर्क कार्यालयात शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.कुस्ती स्पर्धेत परळीतील शालेय विद्यार्थीनीने जिल्हास्तरावर यश संपादन करणे ही गौरवाची बाब असल्याचे यावेळी मुन्ना बागवाले यांनी सांगितले.यावेळी मुन्ना बागवाले मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा