बुधवार, २५ जानेवारी, २०२३

MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक

 देशातील 901 पोलिस कर्मचार्‍यांना सेवापदके प्रदान



महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक

    
नवी दिल्ली,
Republic Day गणतंत्र दिनानिमित्त 901 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलीस पदक (PMG) 140 जणांना, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) 93 जणांना आणि पोलीस पदक (PM) उत्कृष्ट सेवेसाठी 668 जणांना देण्यात आले आहे. 140 शौर्य पुरस्कारांपैकी बहुतांश डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित भागातील 80 जवानांना आणि जम्मू आणि काश्मीरमधील 45 जवानांना त्यांच्या शौर्यपूर्ण कृतींसाठी पुरस्कृत करण्यात आले. शौर्य पुरस्कार मिळालेल्या जवानांमध्ये 48 सीआरपीएफचे, 31 महाराष्ट्रातील आहेत. 25 J&K पोलिसांचे आहेत, 9 झारखंडचे आहेत, 7 दिल्ली, छत्तीसगड आणि BSF चे आहेत आणि बाकीचे इतर राज्ये/UTs आणि CAPF चे आहेत.
 
dfsert456
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. इजिप्तचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. Republic Day इजिप्त आणि भारत यांच्यातील संबंध संतुलित आणि स्थिरतेने वैशिष्ट्यीकृत आहेत, असे ते म्हणाले. आपण फक्त सर्जनशील विकास पाहिला आहे. आपण सर्वजण खूप सकारात्मक विकास करत आहोत.
 
 
या यादीत 140 पोलिस शौर्य पदकांचाही समावेश आहे. शौर्य पुरस्कारांपैकी जास्तीत जास्त 80 जवानांना नक्षलप्रभावी भागांत केलेल्या कारवायांसाठी तर, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केलेल्या 45 जवानांना त्यांच्या शौर्यासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
 
देशातील सर्वांत मोठा निमलष्करी दल अर्थात् केंद्रीय राखीव पोलिस दलाला सर्वाधिक म्हणजे 48 पोलिस शौर्यपदके प्राप्त झाली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र पोलिसांना 31, जम्मू-काश्मीर पोलिसांना 25 पदके, झारखंड पोलिसांना 9, दिल्ली पोलिस, छत्तीसगड पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) प्रत्येकी 7 पदके प्राप्त झाली आहेत. पोलिस दलातील शौर्य पुरस्काराची सर्वोच्च श्रेणीसाठी असलेले राष्ट्रपती पोलिस पदक यंदा कुणालाही देण्यात आले नाही. विशेष सेवेसाठी 93 राष्ट्रपती पोलिस पदक आणि गुणवंत सेवेसाठी 668 पोलिस पदकांचाही समावेश आहे.
 
सीबीआयच्या 30 अधिकार्‍यांना पोलिस पदक
बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बाल लैंगिक शौषण सामग्री, महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू आणि लालू प्रसाद यांच्याविरोधातील प्रकरणावर देखरेख करणार्‍यांसह केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 30 अधिकार्‍यांना पोलिस पदके प्रदान करण्यात आली. सीबीआयच्या सहा अधिकार्‍यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक तर, 24 जणांना गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक देण्यात आले आहे.

MB NEWS: या आठवड्यात पाऊस? मरावाडा, विदर्भात पावसाची शक्यता; वरिष्ठ हवामानतज्ज्ञांचे ट्वीट

 या आठवड्यात पाऊस? मरावाडा, विदर्भात पावसाची शक्यता; वरिष्ठ हवामानतज्ज्ञांचे ट्वीट



--------

मुंबई : सध्या निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपाचा परिणाम म्हणून किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, डहाणू येथे मात्र शुक्रवार आणि शनिवार पुन्हा एकदा वाऱ्यांचा प्रभाव जाणवला. कमाल तापमानात घट झाली. एका मागून एक दोन पश्चिमी प्रकोप पुढील आठवड्यात सक्रिय होणार असून याचा परिणाम म्हणून २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरिष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.२० ते २६ जानेवारी आणि त्यानंतर २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिमी प्रकोपाच्या प्रभावाखाली भारताचा उत्तर भाग आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भ येथे या कालावधीत पाऊस पडू शकतो. पश्चिमी प्रकोप स्थितीमुळे चक्रीय वात स्थितीची शक्यता असून ही प्रणाली पूर्वेकडे सरकेल. या प्रवासात या प्रणालीला अरबी समुद्रातून आर्द्रतेचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. या प्रभावामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे २३ ते २७ जानेवारीदरम्यान पाऊस किंवा बर्फवृष्टीची शक्यता संभवते. २४ ते २६ जानेवारीदरम्यान याचा प्रभाव सर्वाधिक असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. यानंतर ही प्रणाली पूर्वेकडे सरकल्यावर राज्यात तिचा प्रभाव जाणवण्याचा अंदाज आहे. यामुळे थोडे ढगाळ वातावरणही निर्माण होऊ शकते.गारा पडण्याची शक्यता२६ जानेवारीपर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या परिणामांचा प्रभावही लक्षात येईल. बर्फवृष्टी तीव्र झाल्यास राज्यात जानेवारीचे शेवटचे दोन ते तीन दिवस थंडीची तीव्रता वाढू शकते, असाही अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार येथे गाराही पडू शकतात. मात्र याचा नेमका अंदाज २३ जानेवारीला रात्री पश्चिमी प्रकोप अधिक सक्रिय झाल्यानंतर उमटणाऱ्या पडसादानंतरच येऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी जारी केलेल्या अंदाजानुसार मात्र राज्यात २५ जानेवारीपर्यंत राज्यात कोरडे वातावरण असेल.

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२३

 आजचे राशिभविष्य दि.२५ जानेवारी २०२३




मेष

मेष : हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर ऊर्जा खर्च करा. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य

वृषभ

वृषभ : व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल.


मिथुन

मिथुन : पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. दूर अंतरावर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील.

कर्क

कर्क : आध्यात्मिक गुरू, वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्हाला जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आज ती इच्छा पूर्ण होईल.

सिंह

सिंह : थोडा आराम, विश्रांती मिळेल. काळजी घेणारा मित्र भेटेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत वचन देऊ नका.


कन्या : जे लोक दूध व्यवसायात आहेत अशांना आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. गरज भासलीच तर मित्र नक्की मदतीला धावून येतील.

तुळ : तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. इतरांवर खर्च करणे टाळा.



वृश्चिक : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आज सर्वचजण तुमच्याशी मैत्रीचा प्रयत्न करतील आणि तुम्हीही हे बंधन आनंदाने स्वीकाराल.



धनु : तुमचे धैर्य पाहून तुम्हाला प्रेम मिळेल. अपेक्षित असलेली कौतुकाची थाप आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल.


मकर : दिवस रोमँटिक असण्याचे संकेत आहेत. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बराच काळ वाट पाहात असलेली कीर्ती, मान्यता मिळेल.



कुंभ : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. कामकाजाच्या ठिकाणी होणार्‍या विविध बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.



मीन : कामातील चुका मान्य करणे फायद्याचे ठरेल. स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असल्यास माफी मागा.

MB NEWS:महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक

  देशातील 901 पोलिस कर्मचार्‍यांना सेवापदके प्रदान महाराष्ट्रातील चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलिस पदक                   नवी दिल्ली, Repub...